मुंबई : जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे. सत्य फार काळ झाकून ठेवता येत नाही आणि त्याला आधाराचीही गरज नसते. सत्यमेव जयते. अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने चौकशी समित्या स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आला आहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हंटले आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे.
सत्य फार काळ झाकून ठेवता येत नाही आणि त्याला आधाराचीही गरज नसते. सत्यमेव जयते. @Dev_Fadnavis pic.twitter.com/hDKw34fl5J— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 27, 2021
यावर आता भाजप नेत्यांतून प्रतिक्रिया येत आहेत. तेव्हा झालेल्या आरोपात कोणतेही तथ्य नव्हते याचा जणू पुरावाच आता भाजपाला मिळाला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या,जलयुक्त शिवार मध्ये’दूध का दूध पानी का पानी’ झालं.. सरकारच्या समितीनंच आरोप करणा-यांचं तोंड रंगवलंय असं म्हणत त्यांनी सरकारवर तोफ डागली. पुढे त्या म्हणाल्या, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ कामाची पावती दिलीय तर भ्रष्टाचाराचं शिवार समजून MVA जनतेची लूट करतीये. भ्रष्टयुक्त सरकार’विरूद्ध लढा सुरूच राहील. ना खाऊंगा ना खाने दूंगा..!! असे म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- राज्य सरकारची क्रुझवरील पार्टीला परवानगी नव्हती- नवाब मलिक
- नाव फलकावरून खा.भावना गवळींचे नाव वगळल्याने शिवसैनिकांत संताप


