Share

दिवंगत आभिनेते श्रीकांत मोघेंच्या आठवणीत प्रिया मराठेची भावनिक पोस्ट

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री प्रिया मराठे यांनी सोशल मीडीयावर श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया मराठे या दिवगंत श्रीकांत मोघे यांच्या सुन आहेत.

प्रिया मराठे हिने इंस्टाग्रामवर अभिनेते श्रीकांत मोघे यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. या पोस्टमध्ये प्रियाने श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटो सोबत प्रियाने लिहिले की, माझा बाबा! इतकं प्रेम , माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल. तुम्ही ‘सासरे’; फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. ‘माझं पीयूडं’; ‘माझं लाडकं’; अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की ‘आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे’; असे सगळे प्रश्न विचारायचा.

गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण या दरम्यान त्यांच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता पाहिली नाही, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम बघण्यास मिळाला. ‘मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे’; हे धोरण मानून कश्यातच तो फार अडकला नाही.हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील, असे प्रियाने पोस्टमध्ये म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!