मुंबई : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते.
भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले असले तरीदेखील भारतीय फलंदाजांची टीम इंग्लंडवर भारी पडू शकते असा विश्वास आहे. त्यामुळे डाव्या हाताने फलंदाजी करणारे इंग्लंडला धूळ चारणार असल्याचा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.
ऋषभ पंत, अक्षर पटेल, रोहिल शर्मा, वॉशिंग्टन सुंदर यांची भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी राहिली आहे. त्यांनी इंग्लंडला अक्षरश: जेरीस आणलं होतं. त्यामुळे इंग्लंडला तंबूत धाडण्यासाठी चार खेळाडू सज्ज आहेत. शिखर धवन आणि इशान किशन डाव्या हाताने खेळणारे खेळाडू आहेत. शिखर जरी पहिला सामना खेळणार नसला तरी उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळल्यानं इंग्लंड संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, वकिल महिला घोड्यावर बसून न्यायालयात दाखल
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

