Share

काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती – राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती परंतु पक्षाने भारताच्या घटनात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके पडसाद राजकीय वर्तुळाता कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी हे चुकीचंच होतं. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पण सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला. आरएसएस आपली माणसं पेरुन स्वतंत्र संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. कौशिक बासु यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘मला वाटते की आणीबाणी ही एक चूक होती. पूर्णपणे ती चूक होती. आणीबाणीत जे घडले आणि आता जे घडतंय त्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. जे चूक होते आणि आता जे घडत आहे. कॉंग्रेस पक्षाने कधीही भारताला पकडण्याचा प्रयत्न केला नाही घटनात्मक चौकट. आमची रचना आम्हाला परवानगी देत नाही. आम्हाला ते करायचे असल्याससुद्धा आम्ही करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. आणीबाणीमध्ये काँग्रेसने कधीही भारतातील संस्थात्मक रचनेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला नाही आणि स्पष्टपणे सांगायचं झाल्यास काँग्रेसकडे तशी क्षमता देखील नव्हती आणि भारताची जी संविधानात्मक रचना आहे ती याला परवानगीच देत नाही. जरी आपल्याला तसं करायचं असलं तरीही करता येत नाही.’ असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!