Share

‘बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीचे नाव घेताना डीसीपी बायकोचं नाव घ्यायचं असल्याप्रमाणे लाजत होते’

Published On: 

मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.फडणवीस यांनी काल विधानसभेत अनेक मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले व आरोपांच्या फैरी झाडल्या.

राज्यातील कायदा सुव्यस्था आणि शक्ती कायदा यावर फडणवीसांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांवर आणि औरंगाबाद पोलिसांच्या या प्रकरणातील भूमिकेवर फडणवीस यांनी प्रहार केला.

मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपावरूनही फडणवीसांनी निशाणा साधला. मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई करण्यात आली नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे आले. इतका पोलिसांवर दबाव आहे. सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आणि जनतेसाठी दुसरा न्याय, असेच चालणार असेल तर कशाला हवा शक्ती कायदा, असा खरमरीत सवालच देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

फडणवीस म्हणाले,‘मेहबूब शेखवर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून कारवाई केली जात नाही. ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आणि त्यानंतर ती महिला वारंवार म्हणतेय की, याच व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. पण वास्तव काय याला डीसीपी पाठिंबा देतात. जसं की लग्नात नवरा नवरी नाव घेताना लाजतात तसं डीसीपीला आरोपीचं नाव विचारल्यावर लाजत होता. जणू काही बायकोचं नाव घ्यायचं आहे. ते तर आहेच ना? तुम्ही त्यात बघू घ्याना, असं पत्रकारांना सांगत होते असं म्हणत फडणवीस यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,इतका सरकारचा दबाव?. आमच्याही पक्षात चुकीची लोकं असू शकतात. कोणत्याही पक्षात असे लोकं असू शकता. म्हणून काय तो पक्ष चुकीचा असतो असं नाही. पण आपण जर सत्ता पक्षाला वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाला वेगळा न्याय असं ठरवलं असेल तर कशा हवाय शक्ती कायदा?,’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!