मुंबई : गेल्या वर्षी पासून कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर मोठा परिणाम झाला असून प्रवेश प्रक्रियांबाबत देखील मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेताच अंर्तगत मूल्यमापन व आधीच्या वर्गातील गुण यांच्या आधारावर दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
अकरावीच्या प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा घेण्याचे राज्य सरकारने ठरवले होते. मात्र एका विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षांचा निर्णय रद्द केला. यानंतर अकरावी प्रवेशांबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
या शहरांमध्ये अकरावीचे प्रवेश घेण्याबाबतचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. दरम्यान, ५ शहरांमधील उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
यालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेबांचेही या गोष्टींवर लक्ष’; चित्रा वाघ यांचे पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य
- ‘महिलेला न्याय मिळवण्यासाठी जीवच द्यावा लागेल का ?’; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
- ट्विटरनंतर आता राहुल गांधींचे इन्स्टाग्राम खातेही होणार बंद?
- ‘या’ राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट? ; ११ दिवसात ५४३ बालकांना कोरोनाची लागण
- ‘राजीव गांधींनी पवारांना ओळखून कधीच जवळ केलं नाही, पण राहूल गांधी तेवढे परिपक्व नाहीत’


