मुंबई : २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपला देशभरात मोठा फायदा झाला. विविध राज्यांसह केंद्रात देखील भाजपने सत्ता काबीज केली. यानंतर, देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससह विविध भाजप विरोधी पक्षांची घसरण सुरु झाली. यामुळे २०१९ मध्ये अधिक संख्याबळाने मोदी सरकार स्थापन झाले.
आता गेल्या दीड वर्षात विरोधकांची एकजूट करून भाजप विरोधात प्रबळ विरोधक निर्माण करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. देशभरातील विविध भाजप विरोधी नेत्यांना एकत्रित करून भाजपची राष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची चांगलीच आक्रमकता पाहायला मिळाली.
१०० खासदारांची आघाडी तयार करून विरोधकांना वाटतयं मोठं काम झालं. राहुल गांधी कधीच सुधरणार नाही, स्व. राजीव गांधी यांनी पवार साहेबांना ओळखून त्यांना कधी जवळ केलं नाही कारण त्यांना माहीत होतं पवार साहेब कधी सटकतील कळणार नाही पण राहुल गांधी आपले कोण परके कोण कळण्याइतके परिपक्व नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 13, 2021
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘१०० खासदारांची आघाडी तयार करून विरोधकांना वाटतयं मोठं काम झालं. राहुल गांधी कधीच सुधरणार नाही, स्व. राजीव गांधी यांनी पवार साहेबांना ओळखून त्यांना कधी जवळ केलं नाही कारण त्यांना माहीत होतं पवार साहेब कधी सटकतील कळणार नाही पण राहुल गांधी आपले कोण परके कोण कळण्याइतके परिपक्व नाही,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नागपंचमी नव्हे हि तर जुगाऱ्यांची ‘पत्ते पंचमी’! याच दिवशी शिऊरला सर्रास भरता पत्त्यांचे डाव
- ‘महिलेला न्याय मिळवण्यासाठी जीवच द्यावा लागेल का ?’; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
- ट्विटरनंतर आता राहुल गांधींचे इन्स्टाग्राम खातेही होणार बंद?
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर


