Share

‘या’ राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट? ; ११ दिवसात ५४३ बालकांना कोरोनाची लागण

Published On: 

बंगळुरु : कोरोना महामारीने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. त्यातच आता बंगळुरूतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरूतील ५४३ मुलांना ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही मुले १ ते १९ वयोगटातील आहेत.

यामुळे कर्नाटक सरकारने तातडीची बैठक बोलवली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या ११ दिवसात बंगळुरूत ५४३ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे बंगळुरू महानरपालिकेने सांगितले आहे. यातील बहुतेक मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. तर काही जणांमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत. कुठल्याही प्रकारे गंभीर लक्षणे असलेले लहान मुले रुग्णालयात दाखल झाली आहेत का? याची आम्ही तपासणी करत आहोत. मात्र, या तपासणीत सुद्धा आम्हाला सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेली लहान मुले आढळली आहेत ज्यांना घरात उपचार देता येईल, बीबीएमपीचे आरोग्यविभागातील विशेष आयुक्त रणदिप. डी. यांनी सांगितले आहे.

देशात ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोरोनाची लाट येईल. या तिसऱ्या लाटेत देशात दररोज 1 लाख कोरोना रुग्णांचे निदान होईल, अशी आयसीएमआरचे प्रो. डॉ समीरन पांडा यांनी याआधी व्यक्त केली होती. त्यामुळे आता अधिक खबरदारी घेव्य्न देशातील प्रशासन अधिक सतर्क झाले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!