नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्वीटरचे खाते निलंबित करण्यातआल्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चिघळले असल्याचे सध्या तरी पहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम असणाऱ्या ट्विटरने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि काही नेत्यांचे अकाऊंट लॉक केले आहे. त्यावर मोठी चर्चा आणि आरोप सुरू आहेत. ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला होता.
मात्र, आपल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्विटरने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचे आणि पक्षाची सर्व अकाऊंट लॉक केल्याबद्दल ट्विटरवर निशाणा साधला आहे. दरम्यान आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने फेसबुकला पत्र लिहून राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम पोस्टबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने फेसबुकला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड केली आहे, जे बाल न्याय कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे.
आयोगाने फेसबुकला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ती पोस्ट त्वरित काढून टाकावी. यासह, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती 3 दिवसांच्या आत द्यावी. अशी त्यांनी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हिंदुत्व आम्हाला कोणी शिकाऊ नये’, संजय राऊतांचा टोला
- चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालयाने खडसावल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले
- स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला राज्यपाल कोश्यारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
- सरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या
- १२ आमदारांचा वाद; ‘राज्यपाल उत्तर देण्यास बांधिल नाहीत, त्यांना आम्हीही निर्देश देऊ शकत नाही’, हायकोर्टाचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

