Share

‘महिलेला न्याय मिळवण्यासाठी जीवच द्यावा लागेल का ?’; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

Published On: 

पुणे : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.

आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. मात्र, त्याकाळी राठोड हे मंत्रीपदी असल्याने कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘पतीला नोकरीवर पूर्ववत करण्यासाठी संजय राठोड यांनी मानसिक, शारीरिक छळ केला. यासोबतच आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेने तक्रार करताना वजनदार राजकीय नेते संजय राठोड असा उल्लेख केला असून हा दुसरा तिसरा कोणी नसून माजी वनमंत्री संजय राठोड हाच आहे,’ असं चित्रा वाघ यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं.

यासोबतच, ‘राज्यात सध्या महिलांच्या तक्रारींची त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची दखलच घेतली जात नाही आहे. पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी सबळ पुरावे असताना देखील एफआयआर दाखल केला नाही. या महिलेने लेखी तक्रार करून देखील या विषयी पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे महिलेने न्याय मिळवण्यासाठी जीवच दिला पाहिजे का ? तरच पोलिसांकडून काही कारवाई केली जाईल का ? हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं,’ असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!