पुणे : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. मात्र, त्याकाळी राठोड हे मंत्रीपदी असल्याने कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
‘पतीला नोकरीवर पूर्ववत करण्यासाठी संजय राठोड यांनी मानसिक, शारीरिक छळ केला. यासोबतच आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेने तक्रार करताना वजनदार राजकीय नेते संजय राठोड असा उल्लेख केला असून हा दुसरा तिसरा कोणी नसून माजी वनमंत्री संजय राठोड हाच आहे,’ असं चित्रा वाघ यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं.
अशा प्रकरणांमध्ये पोलिसही हातावर हातात ठेवल्यामुळे महिलांना न्याय मिळत नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच, संजय राठोड यांच्यासह महिलांवरील अन्य अत्याचारांच्या प्रकरणावर योग्य कारवाई व्हावी यासाठी त्या महाविकास आघाडी सरकार निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार का? असा सवाल पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या, ‘पवार साहेबांचेही या गोष्टींवर लक्ष आहे. गरज भासल्यास मी त्यांची भेट देखील घेईन,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
यासोबतच त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. ‘गृहमंत्री दखल घेत नाहीत हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून याबाबतही त्यांना पत्र लिहिणार आहे,’ असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरू आहे का?’, आशिष शेलारांचा हल्लाबोल
- ‘महिलेला न्याय मिळवण्यासाठी जीवच द्यावा लागेल का ?’; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
- ट्विटरनंतर आता राहुल गांधींचे इन्स्टाग्राम खातेही होणार बंद?
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘राजीव गांधींनी पवारांना ओळखून कधीच जवळ केलं नाही, पण राहूल गांधी तेवढे परिपक्व नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

