Share

आता पुण्यातून ‘या’ पाच शहरांमध्ये धावणार इलेक्ट्रिक एसटी; वाचा काय आहे खासियत !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच प्रवाशांच्या लाडक्या एसटीने गेल्या वर्षी साठी पूर्ण केली आहे. या बदलत्या काळात एसटीचे रुपडे देखील पालटले असून अधिकाधिक सुखकर व सुरक्षित प्रवास व्हावा याकडे महामंडळाकडून प्राधान्य दिले जात आहे. सध्याच्या वाढत्या प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने विविध राज्यांमधील शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात आल्या आहेत.

आता एसटी देखील पर्यावरण बचावासाठी सरसावली असून एसटीमध्ये देखील इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. सुरुवातीला पुण्यातून विविध ५ मार्गांसाठी ही सेवा सुरु केली जाईल. दरम्यान, राज्यात ७ शहरांमध्ये एसटीने चार्जिंग स्टेशन देखील निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रायोगिक तत्वावर अनुभव आणि प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यभरातील उर्वरित मार्गांसाठी देखील एसटीच्या इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात येतील.

एसटी प्रशासन १५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लवकरच यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे. एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करून देण्याची जबाबदारी महामंडळाची असणार आहे. त्यासाठी पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर या चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. पुण्यात तब्बल ३ हजार किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा अंदाजे खर्च सुमारे २ कोटी रुपयांच्या घरात आहे.

एकदा चार्ज केल्यावर बस किती किलोमीटर धावेल ?

एक बस चार्ज होण्यासाठी २ तासांचा वेळ लागेल. एकदा चार्ज झाल्यानंतर बस साधारण ३०० किमी धावेल. पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये २० चार्जिंग पॉईंट्स असतील. यात १५० किलोवॉटसाठी १० चार्जर तर ९० किलोवॉटसाठी १० चार्जरचा वापर केला जाईल.

पुण्यातून कोणत्या मार्गांसाठी धावणार इलेक्ट्रिक एसटी ?

भाडेतत्वावर घेण्यात येणार असलेल्या १५० बस पैकी पुणे विभागाच्या वाट्याला ३० बस येणार आहेत. या बसची आसनक्षमता ४३-४५ असेल. पुढच्या सहा महिन्यात पुणे स्थानकावरून राज्यातल्या पाच मार्गांसाठी इलेक्ट्रिक एसटी धावणार आहेत. यामध्ये पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-महाबळेश्वर या मार्गांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!