मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे. राज्यात कोरोनामुळे शासनाने दहीहंडी उत्सवावर बंदी घातली होती. मात्र मनसेने शासनाचे सर्व नियम झुगारून आज दहीहंडी फोडलीच. यावरच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. अस्वलाच्या अंगावर किती केस आहेत, ते अस्वल मोजत नाही तसं आमच्यावर किती केस आहेत. हे आम्ही मोजत बसत नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला वेठीस धरले आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर नियम भंग करत दहीहंडी फोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मात्र राज्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु असून, एकीकडे सेनेच्या अनेक सभा, मेळावे घेतले जातात तेव्हा कोरोना पसरत नाही का, असा सवाल करत त्यांनी मीच मनसे कार्यकर्त्यांना दहीहंडी फोडण्याचे सांगितले होते, असेही म्हटले आहे.
कोरोना फक्त सण उत्सवांमध्येच होतो का, असे म्हणत त्यांनी सर्व काही सरकार सूडबुद्धीने करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नियम करायचे तर सर्वांसाठी सारखेच नियम करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांकडून तो ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल – राज ठाकरे
- ‘बाळासाहेबांच्या नावाने हडपलेल्या बंगल्यावर येणाऱ्या गाड्या थांबल्या का ?’ राज ठाकरेंचा सवाल
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

