मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला तशी विनंती केली आहे.
त्यानुसार सुप्रिया सुळेंसह ठाकरेंना देखील कालपर्यंत ही नोटीस पोहोचणे अपेक्षित होते. कृषी विधेयकासह अन्य महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुक आयोगाच्या नोटिशीवरून मोठा खुलासा केला.
“निवडणूकआयोगाच्या सांगण्यावरून माझ्या प्रतिज्ञापत्रावर देखील काल कर मंडळाने मला नोटीस बजावली आहे. त्याला मुदतीमध्ये योग्य ते उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच देशभरातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर प्रेमाची भावना आहे हे चांगलं आहे,” असा उपहासात्मक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. याआधी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिल्या जात. मात्र, या भूमिकेत निवडणूक आयोगानं आता बदल केला आहे. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचं आयोगानं ठरवलं आहे. एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ९९% शिवसैनिकांना संज्या खटकतो म्हणून ते त्याला फाट्यावर मारतात…
- #मराठा_आरक्षण : संभाजीराजेंनी केले राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत! म्हणाले…
- ‘देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ : खासदार राजीव सातव
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’


