मुंबई : केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. ‘
शिवसेनेच्या या भूमिकेवरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ‘आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला’. अस ट्विट निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 22, 2020
महत्वाच्या बातम्या
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…
- प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली !
- मराठा आरक्षणाच्या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची वेळही येऊ शकते
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’


