मुंबई : केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. तर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.
यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला राजकरणापलीकडे जाऊन भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कृषी विधेयकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सध्या स्वतंत्र भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयके चुकीचीच आहेत, असे सांगतील. केंद्र सरकारच्या जाहिराती बारकाईने पाहिल्यास सरकारचा फसवेपणा लक्षात येईल. बाजार समिती हे आधारभूत किंमत देण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्या मोडीत काढून शेतमालाची विक्री बाजार समितीच्या बाहेर होणार आहे. मग तिकडे आधारभूत किंमत कशी मिळू शकते, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंवरील दंडात्मक कारवाईचं वृत्त खोटं!
- ९९% शिवसैनिकांना संज्या खटकतो म्हणून ते त्याला फाट्यावर मारतात…
- संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या कारवाई निषेधार्थ कळमनुरी शहरामध्ये काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
