नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.
विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे.
विशेष म्हणजे, निलंबित खासदारांनी सोमवारपासून गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला. त्यांच्या या गांधीगिरीला उत्तर देत खुद्द उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सकाळी चहा आणला होता. यानंतरही या खासदारांनी आपली नाराजी कायम ठेवली आहे.
काँग्रेसचे खासदार राजीव सातव देखील या खासदारांसोबतच उपोषणाला हजर होते. तर आज त्यांनी एक ट्विट करून संघर्षमय भूमिका कायम ठेवल्याचे एकप्रकारे जाहीर केले आहे. ” सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है! ” या प्रसिद्ध काव्यपंक्ती त्यांनी ट्विट करत भाजपमुळे लोकशाहीचा मृत्यू असे हॅशटॅग देखील वापरले आहे.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।#BJPKilledDemocracy— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) September 22, 2020
महत्वाच्या बातम्या :
- ९९% शिवसैनिकांना संज्या खटकतो म्हणून ते त्याला फाट्यावर मारतात…
- #मराठा_आरक्षण : संभाजीराजेंनी केले राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत! म्हणाले…
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

