उस्मानाबाद: नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची असते. पण जेव्हा पोलीसच भक्षक बनतात तेव्हा नागरिक दाद मागायला जाणार तरी कुठे ? अशीच एक घटना उस्मानाबाद येथे घडली आहे. एका पोलीस नाईकने महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केला. या अत्याचाराला कंटाळून त्या महिलेने आत्महत्या केली आहे.
उस्मानाबादेतील एक महिलेलने बांधकामाच्या ठिकाणी गळफास लावत आत्महत्या केली आहे. उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस नाईक हरिभाऊ रामदास कोळेकर यांनी २०२० मध्ये त्या महिलेच्या घरी जात बळजबरी करत अत्याचार केला . या घटनेची कुठेच वाच्यता करू नको असे त्यांनी तिला धमकावले, पुढे तो तिच्यावर सतत बलात्कार करत राहिला. या जाचाला कंटाळून तिने आत्माहत्या केली. शेवटी एक न लिहीत तिने त्या पोलीस नाईकला घटनेसाठी जबाबदार धरले आहे.
या घटने नंतर पोलिसांनी त्या आरोपी विरोधात कलम ३७६, ३०६, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्यामहिलेने पत्रात कोलेकरांनी माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आहे. त्यात माझ्या पतीची काहीच चूक नाही मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे. असे त्यांनी त्या पत्रात नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यभरात गाजत असलेल्या कोविड सेंटरमधील ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!
- ‘सत्ताधाऱ्यांना पाच, आम्हाला फक्त एक कोटी! ऐसा कैसा चलेगा?’
- ‘या’ घटनांमुळे शहरात वाढली दबंगाई
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

