बीड : महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापिकेला व्हाट्सअँप वरून अश्लील मॅसेजची लिंक पाठवत. विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास देत. आठ हजार रुपयाची शिक्षा विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली. आरोपी गजानन नरहरी करपे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका महाविद्यालयातील हि घटना आहे. आरोपी गजानन करपे हा आपल्या सहकारी प्राध्यापकाला वारंवार त्रास देत होता. आरोपी तिथे न थांबता त्याने ‘त्या’ सहकारी प्राध्यापिकेला व्हाट्सअँपवर अश्लील लिंक मॅसेज केली. त्या मॅसेजला प्राध्यापिकेने उत्तर न दिल्यामुळे रस्त्यावर अडवून त्यांना जाब विचारत जातीवाचक शिवीगाळ दिल्या त्यामुळे पीडितेने शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये जात तक्रार दिली.
संबंधित आरोपी हा प्रकार घडल्यापासून म्हणजे २०१७ पासून महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची दाखल घेत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दोषपात्र सादर केले. पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली. पुराव्यांच्या आधारे विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- राज्यभरात गाजत असलेल्या कोविड सेंटरमधील ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!
- ‘सत्ताधाऱ्यांना पाच, आम्हाला फक्त एक कोटी! ऐसा कैसा चलेगा?’
- ‘या’ घटनांमुळे शहरात वाढली दबंगाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

