Share

‘नियोजन होत नसेल तर दीडशे कोटी कोरोनाला द्या’

Published On: 

औरंगाबाद : नियोजना संदर्भात मगील सभेत सूचना करण्यात येऊन देखीलसुद्धा आर्थिक वर्षाच्या निधीचे नियोजन न झाल्याने जिल्हा परिषदेला आलेला १५२ कोटीचा निधा हा कोरोनासाठी द्या, अशा संतप्त प्रतिक्रीया गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी व्यक्त केल्या.

गुरूवारी स्थायी समिती सभा पार पडली. या सभेत विविध विभागातील कामांच्या नियोजनावर सदस्यांवर पदाधिकऱ्यांवर चांगलेच भडकले. ९ फेब्रुवारीच्या सभेत विविध विभागाचा आलेला निधी हा वापस जाणार नाही यासाठी २०१९-२० वर्षातील निधीचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना सर्व सदस्यांनी केल्या होत्या. यावर पुढील पाच दिवसांत नियोजन करू असे पदाधिकऱ्यांनी आश्वासन दिले होते, परतू मार्च महिन्याला सुरूवात झाली तरीही निधीचे नियोजन झाले नाही.

प्रत्येक सभेत पदाधिकऱ्यांना नियोजनाची अठवन करून द्यावी लागते ही अंत्यत खेदाची बाब आहे. कोरोनाच्या नावावर सर्व कामांच्या प्रमा अठवून ठेवत असतील तर जिल्हा परिषदेला आलेला १५२ कोटीचा निधा हा कोरोनासाठी द्या असे मत मांडत सदस्य मधुकर वालतुरे यांनी पदाधिकऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले.

तसेच पदाधिकाऱ्यांकडुन निधीचे नियोजन होत नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यात लक्ष घालत नियोजन करावे अशी विनंती सदस्य केशव तायडे यांनी केली. व ग्रामीण भागातील विकास कामांवर खोडा घालत असेल तर या पदावर काम करण्याचा अधिकार नसल्याचे तायडे म्हणाले. यावर आरोग्य व शिक्षण विभागाचा निधीचे नियोजन झाले असुन एकही पैसा वापस जाणार नाही असे सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!