Share

Eknath Shinde : “गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीची” ; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं, यांनतर एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी काल सोमवारी सूरत गाठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारी बोलवलेल्या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदेच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर बोलताना शिंदे म्हणाले, “गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीने झाली आहे. सर्व आमदारांना बोलवून बहुमताने गटनेता निवडला जातो. पण बहुमताचा आकडा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे काल निवडण्यात आलेला गटनेता हा कायदेशीर नाही”.

एकनाथ शिंदेंचा ४० आमदारांसोबत वेगळा गट स्थापन –

एकूण ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराजे चौघुले, रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा,  प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!