ठाणे: सध्या स्थानिक पातळीवरील निवडणुका (Elections 2022) सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे तर स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा आघाडी असणार का, अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढत असल्याचे देखील बघायला मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केडीएमसी निवडणुकीत आघाडीसाठी आम्ही तयार आहोत असे विधान केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीची संकेत मिळत आहे. मात्र कॉंग्रेसची भूमिका या निवडणुकांमध्ये काय असणार आहे याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्री मलंगगड क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी मलंग गड पट्ट्यात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नगरसविकास मंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यानं स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडी करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काही हरकत नाही, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गेल्या ५ वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिप्पट श्रीमंत; संपत्तीत इतक्या कोटीने वाढ
- IPL Auction 2022 : शिवम दुबेची डबल लॉटरी; चेन्नईत मिळाली जागा अन्…
- IPL AUCTION 2022: चेतन साकारिया ४.२ कोटीत दिल्ली कॅपिटल्समध्ये
- पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांचे टीकास्त्र; म्हणाले,‘जोशीबुवांचं काम कधीपासून…’
- ‘बच्चू कडू यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा’; भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

