मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं.’
कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 17, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध- नवाब मलिक’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- …तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील- व्ही. के. पॉल


