🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट व भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली. फडणवीस यांना नाईलाजाने पक्षश्रेष्ठींचे आदेश मानावे लागले असेही म्हटले जात होते. मात्र या सगळ्यांमध्ये आता शिंदे-भाजप सरकार चांगलेच रंगात आलेले पाहायला मिळत आहे. या सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष पदही काबीज केले. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर आज या सरकारने यशस्वीरित्या बहुमतही सिद्ध करत बाजी मारली. त्यामुळे आता राज्यात शिंदे-भाजप सरकार किती काळ टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस गाजला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिलखुळास भाषणाने. मुख्यमंत्र्यांनी मागील १५ दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय नाट्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घटनांना मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात अतिशय गमतीशीर पद्धतीने मांडले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनसह विरोधी पक्षातील व सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदार पोट धरून हसले. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये संजय पवार यांचा पराभव कसा झाला याबद्दलही खुलासा केला.
राज्यसभेच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आम्ही राज्यसभेसाठी दिलेले दोन्ही उमेदवार निवडून येणार होते तशी आम्ही फुल फिल्डिंगही लावली होती. यानंतर थोरात साहेब म्हणाले ४२ मतं आम्ही घेतो. मात्र त्यांनी घेतली ४४ मतं. अजित दादांनी घेतली ४३ मतं. म्हटलं आता एवढं सगळं झाल्यानंतरही आपला दुसरा उमेदवार निवडून येऊ शकते. साला बघितलं तर आमचा दुसरा माणूस पडला. आमचे दोन्ही उमेदवार निवडून येण्याचे गणित आम्ही आखले होते. तशी पूर्ण फिल्डिंगही लावली होती. पण राऊत साहेब निवडून आले आणि दुर्दैवाने संजय पवार यांचा पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
