मुंबई : बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडसमोर चौथ्या डावात विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी शानदार अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने शानदार गोलंदाजी करताना ४ बळी घेतले. त्यांच्याशिवाय मॅथ्यू पॉट्स आणि स्टुअर्ट ब्रॉडला प्रत्येकी दोन तर जॅक लीच आणि जेम्स अँडरसनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, भारताने चौथ्या दिवसाची सुरुवात तीन गड्यांच्या मोबदल्यात १२३ धावांवर केली. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी पहिल्या अर्ध्या तासात सहज धावा जोडल्या. पहिल्या डावापेक्षा पंतने अधिक सावध फलंदाजी केली. पुजारा स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ६६ धावा केल्या. पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि परदेशी भूमीवर एकाच कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला. त्याने ८ चौकारांसह ५७ धावा केल्याय ८१.५ षटकात भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला.
Innings Break: #TeamIndia make 245 in their second innings. @cheteshwar1 top scores with 66 and @RishabhPant17 makes 57.
India have set England a target of 378 runs.
Details – https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/v6ZkOYgXNq— BCCI (@BCCI) July 4, 2022
संक्षिप्त धावफलक –
- नाणेफेक – इंग्लंड (गोलंदाजी)
- भारत पहिला डाव – सर्वबाद ४१६ (ऋषभ पंत १४६ धावा, रवींद्र जडेजा १०४ धावा, जेम्स अँडरसन ६०/५)
- इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद २८४ (जॉनी बेअरस्टो १०६ धावा)
- भारत दुसरा डाव – सर्वबाद २४५ (चेतेश्वर पुजारा ६६, ऋषभ पंत ५७, बेन स्टोक्स ३३/४)
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

