मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला व तो बहुमताने जिंकला. विधानसभा सभागृहामध्ये बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सभागृहात भाषण करताना तुफान फटकेबाजी केली.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, मी एक शिवसैनिक असून मोकळेपणाने सांगायला घाबरत नाही. जे घडलं ते सांगतोय, असे ते म्हणाले. अगदी अमित शहांशी झालेलं बोलणंही त्यांनी सांगितलं. हम आपके पिछे चट्टान की तरह खडे रहेंगे… हे अमित शहांचं वाक्य होतं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शिंदेंच्या या बंडामागे भाजपाचा मोठा हात होता हे सभागृहातच उघड झालं. तसेच शिवसेनेत अंतर्गत नाराजी कशी वाढत गेली हे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
दरम्यान, पदाच्या लालसेपोटी मी कधीही प्रचार सुरू केला नाही. कधीही कुटुंबाची काळजी घेतली नाही. मी माझ्या समर्थकांना सांगितले की, त्यांचे नुकसान होत असेल, तर शिवसेनेला वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल. मी लढेन आणि मरेन, पण मी मागे हटणार नाही. राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान माझ्याशी खालच्या दर्जाची वागणूक मिळाली. माझे बाप काढण्यात आले, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


