🕒 1 min read
मुबंई : महाराष्ट्रात ज्वालामुखी सारखा पेट घेतलेल्या वेदांता प्रकल्पावरुन प्रचंड वाद सुरु आहे. विरोधक सत्ताधारकांवर वारंवार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा देखील सल्ला दिला आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रीयाः
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यशासनावर जोरदार टीका केलि आहे . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प हा गुजरातकडे वळविण्यात आला असून हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे, त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असतीः
वेदांता प्रक्लप गुजरातला जाणं ही राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे, त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती, राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढल असत, लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला असता, मात्र हा प्रकल्प गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणाार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावीः
सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना हा प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्या यात मोठे राजकारण आहे, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी असेही खडसे म्हणाले.
अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे म्हणाले. मात्र २०१४ निवडणुकीच्या शिवसेनेच्या त्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. मुक्ताईनगरचे असो की , जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली.
गैरसमजातून साधूंना मारहाण झाली, म्हणजे या राज्यात साधु सुध्दा सुरक्षित नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. या घटनेत सुदैवाने अनर्थ टळला अन्यथा पालघरच्या घटनेची पूनरावृती झाली असती, असेही खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Ajit Pawar | शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गद्दारी चालणार नाही ; अजित पवार संतापले
- Sachin Sawant | “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची शक्यता आहे”, सचिन सावंत यांचं ट्विट
- Maharashtra Rain : मुंबईसह ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट! तर राज्यात पुढचे ३ दिवस होणार मुसळधार पाऊस
- NCP | ‘स्वत:ला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके’ ; राष्ट्रवादीची सत्तधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी
- Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांनी तरुणांना दिला इशारा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
