Share

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांनी तरुणांना दिला इशारा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रामधील राजकरण चांगलंच तापलं आहे. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांनीच हा प्रकल्प जाणूनबुजून गुजरातला दिला असल्याचं म्हटलं जातं आहे. अशातच आता राष्ट्रवादी पाक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील टीका केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी तरुणांना इशारा देखील दिला आहे.

अजित पवार यांचा तरुणांना इशाराः

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तरुणांनी वेदांतावरून पेटून उठलं पाहिजे, असा इशाराही पवारांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाः

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली सरकार जनतेला गाजर दाखवत आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात तर मग उठतात कधी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

शिंदे साहेब तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सांगताय सर्वसामान्यांचे सरकार आहे. आमचं सरकार होतं तेव्हा काय सर्व सामान्यांच सरकार नव्हते काय? आम्ही काय वरुन पडलो होतो काय?. तुम्हीही आमच्या मांडीला मांडी लावून बसला होता. झालेली चूक लपवण्याकरीता उगाच काहीही बोलता, असं म्हणज अजित पवांरांनी शिंदेंना सुनावलं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!