मुंबई : वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांनी संयुक्तपणे त्यांचे डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि सेमीकंडक्टर युनिट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दुसरीकडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंद सरकारवर टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, “शिंदे साहेब तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सांगताय सर्वसामान्यांचे सरकार आहे. आमचं सरकार होतं तेव्हा काय सर्व सामान्यांच सरकार नव्हते काय? आम्ही काय वरुन पडलो होतो काय?. तुम्हीही आमच्या मांडीला मांडी लावून बसला होता. झालेली चूक लपवण्याकरीता उगाच काहीही बोलता.”
गद्दार म्हटले की यांचे (शिंदे गट) धाबे दणाणतात-
“गद्दार म्हटले की यांचे (शिंदे गट) धाबे दणाणतात. तुम्ही गद्दार नाही तर तुम्हाला का लागतं. ज्यांनी कोणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल. आम्ही कुणाचे नाव घेतले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालणार नाही,” असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितेल.
तुम्ही गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय?-
“वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन हा प्रकल्पाला तळेगावला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली. यातून दिड लाख रोजगार मिळणार होता. मात्र हा प्रकल्प ज्या ठीकाणी गेला तो दबावातून गेल्याचे समजते. यावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत, का आवाज उठवत नाहीत. आता म्हणतात हा प्रकल्प गेला तर गेला दुसरा मोठा प्रकल्प आणू, मोठा प्रकल्प आणाचं पण हा का जाऊ देत आहात. तुम्ही गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय?”, असा खोचक सवाल देखील अजित पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain : मुंबईसह ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट! तर राज्यात पुढचे ३ दिवस होणार मुसळधार पाऊस
- NCP | ‘स्वत:ला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके’ ; राष्ट्रवादीची सत्तधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी
- Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांनी तरुणांना दिला इशारा, म्हणाले…
- आपले मूल लहान वयात प्रेमात पडले? तर पालकांनी काय करावे, जाणून घ्या!
- Ajit Pawar | “गद्दार म्हणलं की यांचे धाबे दणाणतात” ; अजित पवारांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार


