Share

Sachin Sawant | “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची शक्यता आहे”, सचिन सावंत यांचं ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प वेदांता फाॅक्सकाॅन गुजरातला गेला. यावरुन आतापर्यंत विरोधातील सर्व नेत्यांनी हल्लाबोल केला. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात ट्विट वाॅर देखील पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी देखील सहभाग घेत ट्विट करत निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांचं ट्विटः

वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचं अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे, अशी माहिती देखील सावंत यांनी दिली आहे. ‌

पाहा ट्विटः

वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती, असं सावंतांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होतीः

महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला असल्याचं म्हणत १० बिलियन डॉलर गुंतवणूकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदांता फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील ISMC Digital ही कंपनी ढोलेराला येणार होती‌.या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. आता कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे पळ काढला आहे, असं देखील सावंत म्हणाले.

जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला:

दरम्यान, जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. HCC ही सोडून गेली आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे, अशी माहिती सावंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
दरम्यान, असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून GSPCला ₹१०००० कोटीचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे साठा काय तर गॅसच नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेलं असल्याचं सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!