Share

MNS | “विदर्भातील लोक भाजपला कंटाळली आहेत”; मनसेचा फडणवीसांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं घुमू लागलं असून, राज्यातील सगळे पक्ष निवडणुकीची तयारी करायाला लागले असल्याचं दिसून येतं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी-भेटींमुळे मनसे आणि भाजप यंदाची मुंबई पालिकेची निवडणुक एकत्र लढवणार असल्याचं बोललं जात होतं.परंतू याहीवेळी मनसे स्वबळावर निवडणूक असल्याचं समजतं आहे. अशातच मनसेने देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे काय म्हणाले ?

विदर्भामध्ये भाजप सत्तेत असूनही त्या ठिकाणची अवस्था पाहून लोकांनी विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता नवीन लोकांना संधी द्यायची असून, जनता जुन्या लोकांना कंटाळली आहे, असं म्हणत मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच, मनसे नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला या महापालिकेच्या निवडणुका देखील पूर्ण ताकदीने आणि मोठी तयारी करुन लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मनसे पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून, मनसेने  मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. राज ठाकरे यांचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व 227 जागांवर उमेदवार देणार असल्याचंही संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!