Share

‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले

Published On: 

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी एक दिवसीय मराठवाडा दौऱ्यात आहेत. औरंगाबाद मार्गे ते बीड येथे आले असून, बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेत आहेत. यानंतर ते उस्मानाबादेत खरीप हंगाम आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान बीड शहरात आल्यानंतर आज अजित पवारांचा पारा चांगलाच वाढला होता.

निमित्त होते बीड शहरातील अस्वच्छतेचे. त्याचे झाले असे की, पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आल्याचं त्यांनी गाडीतून उतरताच नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला बोलवा म्हणत फर्मान सोडलं. यावेळी मुख्याधिकारी गुट्टे समोर येताच ‘तुला प्रोटोकॉल कळत नाही का रे’ असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच ‘शहरात किती अस्वच्छता आहे. काम करता की काय करता? मी येणार म्हणल्यावर बैठकीला हजर राहता येत नाही का? डिव्हायडर कधी साफ करता की नाही? दोन दिवसात स्वछता करा नाहीतर बघून घेतो अस म्हणत अजित पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना झापले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हजर होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. दरम्यान, बीडची पालिका ही राष्ट्रवादीचे माजी नेते तथा सध्या शिवसेनेत असलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागर हे त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर टीका करत असतात. आता खुद्द अजित पवारांनीच स्वच्छतेवरून पालिका मुख्याधिकाऱ्यांना सुनावल्याने राष्ट्रवादीच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. यावर जयदत्त क्षीरसागर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही सुनावले होते खडेबोल
गेल्या आठवड्यात पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावले होते. अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले.

‘गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!