🕒 1 min read
Eknath Khadse | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनीही जोरदार उत्तर दिले.
एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे सध्या रिकामे आहेत, ते कुठेही फिरत राहतात. मात्र विरोध करणे हे विरोधक म्हणून त्यांच काम आहे. मी काय केलं, यापेक्षा त्यांनी काय काय केलं? त्यांनी जे केलं ते कारनामे लवकरच समोर येतील, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना इशारा दिला. यावर एकनाथ खडसेंनी महाजनांना खुलं आव्हान दिलं आहे.
ते म्हणाले, “एकटं लढणं हीच खरी ताकद आहे. आज तुमच्याकडे सत्ता आहे, दोन मंत्री आहेत, आमदार तुमच्या बाजूला आहेत. मी एकटा लढतोय. तुम्ही सगळा पेट्या-खोक्यावाला गोतावळा एकत्र झाला, सगळे बोके जरी एकत्र आले, तरी मी एकटा तुमच्याविरोधात उभा आहे. निवडून येऊन दाखवेन.”
तसेच ‘गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कोणत्याही निवडणुका मी हरलो नसून मात्र 2019 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी निवडून आलो नाही. मला तिकीट मिळालं असतं तर मी शंभर टक्के निवडून आलो असतो. मात्र हीच भीती गिरीश महाजन यांना होती आणि त्यामुळे मला तिकीट मिळू नये म्हणून कट रचल्याचा आरोप एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी शोएब अख्तरने इंग्लंडला दिला स्पष्ट इशारा, म्हणाला…
- Deepali Sayyed । दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपमधून विरोध; काय आहे प्रकरण?
- MPSC Recruitment | MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, भाजप आमदाराचा घणाघात
- Eknath Khadse | “हिंमत असेल तर कारनामे बाहेर काढा”, एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

