Share

एकनाथ खडसे आयसीयूत दाखल, बॉम्बे रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याकरिता ते मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. एकनाथ खडसे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. खडसेंवर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. दरम्यान, या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना गुरुवारपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचे सांगितले. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे वकिलांनी कोर्टाला सांगितल्याचे वृत्त ‘टिव्ही ९’ च्या हवाल्याने ‘लोकसत्ता’ने दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!