Share

BJP । राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, भाजप खासदाराचा मोठा दावा

Published On: 

BJP । मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. यामुळे देशमुख, मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. कंबोज यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.  तसेच कंबोज यांच्यानंतर आता भाजपचे माढाचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकर यांनी देखील आता मोठा दावा केला आहे.

रणजिंतसिंह निंबाळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकारणात घडामोडींना मोठा वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती ईडीची कारवाई होणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

तसेच पुढे राष्ट्रवादीमध्ये कोणकोणत्या नेत्यांवर कारवाई होणार, हे लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षांनंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असेही निंबाळकर यांनी सांगितले. यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. तर निंबाळकर यांच्या वक्तव्याला आता राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येतेय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!