Share

‘ईडीची नोटीस ही राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे’, संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. याचे कारण आता परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्रातील भाजपा सरकारला टोला लगावला आहे. ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र असल्याचे वक्तव्य राऊतांनी केले आहे.

‘ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टार्गेट केले आहे. पण परब नोटिशीला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील. तसेच ‘एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे’ असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!