🕒 1 min read
यवतमाळ : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार वारंवार अडचणीत येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. सोमय्या यांनी वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत यामुळे त्या सध्या चांगल्याच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
नुकतेच खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणारा एका कर्मचाऱ्यारी फारुक जौहर याला ईडीनं चौकशीसाठी बोलवले होते असं सांगण्यात येत आहे. 30 ऑगस्ट रोजी भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि इतर ठिकाणच्या संस्थांमध्ये जात झडती घेण्यात आली होती. ईडीनं भावना गवळी यांच्या एका संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते उपस्थित झाले नव्हते.
गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बार्ड कारखाना 25 लाखांत घेतला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. यासंदर्भात सोमय्यांनी विविध तपास यंत्रणांना पत्र लिहीत तक्रार केली होती. त्यानंतर भावना गवळी यांच्या विविध संस्थांवर ईडीकडून 30 ऑगस्ट रोजी धाडी टाकण्यात आल्यात.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेंना आणखी एक धक्का ? ‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द अखेर पाळला’ – विनायक राऊत
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- पुणेकरांना आज मोठा दिलासा : नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
