औरंगाबाद : लॉकडाऊन व संचारबंदीमुळे रिक्षाचे हफ्ते भरता न आल्याने आणि रिकव्हरी एजंट यांनी सतत त्रास दिल्यामुळे राजीवनगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन परिसर येथील आत्महत्या करणाऱ्या २७ वर्षीय युवक भिमराव राजु साबळे यांच्या घरी खासदार इम्तियाज जलील यांनी आज भेट देवुन परिवाराचे सांत्वन केले. साबळे यांच्या पत्नी, आई व भावांची यांची विचारपुस करुन एमआयएम पक्षाच्या वतीने आर्थिक मदत ही केली.
दर सोमवारी कोरोना बाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना वर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक असते. बैठकीत फक्त चर्चा होवुन सर्वसामान्याच्या बाबतीत काहीच तोडगा निघत नसल्याने आणि जनतेच्या उदरनिर्वाह साठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात येणाऱ्या उदासिनतेमुळे खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
बैठकीस उपस्थित न रहाता रिक्षाचे हफ्ते भरता न आल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या भिमराव राजु साबळे यांच्या घरी भेट देवुन त्यांची पत्नी राजश्री भिमराव साबळे व आईची विचारपुस करुन त्यांच्या सर्व अडीअडचणी, समस्या व बँकवाल्यांनी कशाप्रकारे त्रास दिला याची माहिती घेतली. खा. इम्तियाज जलील पाहताच मयताची विधवा पत्नी व आईचे अश्रु अनावर झाले होते. मयत भिमराव राजु साबळे यांच्यावर आई, पत्नी व त्यांच्याहुन लहान सहा भावांची संपुर्ण पालनपोषणाची जबाबदारी होती.
साबळे यांचे घर टिनशेडचे असुन विद्युत पुरवठा हि नसल्यासारखेच आहे, एवढ्या हलाखाच्या परिस्थितीत जीवन जगत असुन, लॉकडाऊनमुळे शाळा ही बंद असल्याने शाळकरी मुलांचे भाडे मिळणे ही बंद झाल्याने त्यांचे पत्नी व आई हे रस्त्यावरील भंगार जमा करुन घरचे उदरनिर्वाह करत असल्याचे साबळे यांच्या पत्नीने खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले.
राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे, प्राथमिकता कोणत्या कामांना द्यावी आणि गोरगरीबांच्या वस्तुस्थितीची माहितीच नसल्यामुळे रिक्षा चालक आत्महत्या करत आहे. गोरगरीबांना उदरनिर्वाहाची व्यवस्था करुन लॉकडाऊन व संचारबंदी केली असती तर युवकांना त्यांचे जीव देण्याची वेळच आली नसती. गोरगरीब परिवार सध्या कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहे, कसे मरणयात्ना भोगत आहे याची जाणीव मोठमोठ्या एसी हॉलमध्ये बैठक घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कधिच कळणार नाही, असे हि खा. जलील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

