Share

फुल और कांटे! इंग्लंड की श्रीलंका, पृथ्वी शॉवर केलेलं जाफरचं ट्विट तुफान व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : भारतीय संघ सध्या वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावर आहे. प्रमुख खेळाडूसह विराट कोहली हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर इतर खेळाडूसह शिखर धवन श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला पर्यायी खेळाडू म्हणून पृथ्वी शॉचे नाव समोर आले आहे.

बीसीसीआयने जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची निवड केली तेव्हा पृथ्वी शॉची निवड न झाल्यामुळे निवड समितीवर टिकेची झोड उठली होती. मात्र शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून दौऱ्यातील उपलब्ध इतर खेळाडूऐवजी दौऱ्यावर नसलेल्या खेळाडूची निवड होणार असल्याने क्रिकेटप्रेमीमध्ये कमालीची नाराजी आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाताना पृथ्वी शॉ अनफीट म्हणून त्याला वगळण्यात आले होते. मग आता त्याची निवड कोणत्या निकषावर होत आहे. असा सवाल प्रश्न सोशल मीडीयावर उपस्थित केला जात आहे.

आता यावर भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने पृथ्वी शॉबद्दल एक मजेदार मीम शेअर केलं आहे, त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाफरने पृथ्वी शॉला इंग्लंड आणि श्रीलंका याच्या मध्ये ठेवले आहे. त्याने बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या एका चित्रपटातील दृश्य मीम म्हणून वापरले आहे. या मिममध्ये अजय देवगन एकाच वेळी दोन गाड्यांवर पाय ठेवून उभा असलेला दिसत आहे. वसिम जाफरच्या या मीमला सध्या नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!