Share

जेम्स अॅंडरसनने गाठला मैलाचा टप्पा! प्रथम श्रेणीत १००० बळी पुर्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने न्युझीलंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडुन सर्वाधीक कसोटी सामने खेळण्याच विक्रम प्रस्थापित केला होता. यानंतर सोमवारी त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत जेम्स अॅंडरसन लँकशायर संघाकडुन खेळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लँकशायर संघाकडुन गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनने १९ धावा देत प्रतिस्पर्धी संघ केंटचे ७ गडी बाद केले. केंटचा फलंदाज हेनो कुहनला बाद करताच जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणीमध्ये १००० बळीचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अँडरसनने ९०४ गडी बाद केले आहे.

अशी कामगीरी करणारा अँडरसन केवळ १४वा खेळाडू आहे. तर पाचवा वेगवान गोलंदाज आहे. यापुर्वी एण्डी कॅडिक, मार्टिन बिकनेल, डेवॉन माल्कम आणि वसीम अक्रम या चार वेगवान गोलंदाजानी ही कामगिरी केली आहे. एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची अँडरसनची ५१वी वेळ. या सामन्यात अँडरसनने सुरुवातीच्या ७ षटकात केवळ ३ धावा देत ५ गडी बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!