Share

आयपीएलमध्ये पुन्हा १० संघ! स्पर्धेचे स्वरुपही बदलण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यानंतर उर्वरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रश्न उभे होते. तसेच आगामी हंगामात बीसीसीआयने दोन नवीन संघाची निवडही स्थगीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र कोरोनाच्या या कठीण परिस्थीतीतही बीसीसीआयने स्पर्धा आयोजीत करण्याचा चंग बांधला आहे. ठरल्याप्रमाणे आगामी आयपीएल स्पर्धेत दोन नवीन संघाचा समावेश केला जाणार हे निश्चीत झाले आहे. स्पर्धेत संघाची वाढ झाल्यामुळे स्पर्धेचे स्वरुपही बदलले जाण्याची शक्याता आहे. यापुर्वी स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकाशी २ सामने खेळायचा. मात्र आता तसे होणार नाही.

आगामी स्पर्धेत ५-५ संघाचे दोन गट विभागून देण्यात येणार आहे. या दोन गटात प्रत्येक संघाला ८ सामने खेळावे लागतील. यातील घरच्या मैदानावर ४ सामने आणि बाहेरच्या मैदानावर ४ सामने होतील. यामुळे संघाची वाढ जरी झाली तरी सामन्याची संख्या केवळ १४ ने वाढणार आहे. सध्या आयपीएलमध्ये ६० सामने होतात. संघाची संख्या वाढल्यानंतर मात्र ७४ सामने होतील. यापुर्वी २०११ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत १० संघाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी सहारा पुणे वॉरीयर आणि कोची टस्कर्स या दोन संघाचा समावेश करण्यात आला होता.

जर स्पर्धा सध्या सुरु आहे त्याप्रकारे खेळवली तर सामन्याची संख्या ९४ इतकी होईल. यामुळे परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहु शकते. तसेच आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक वर्षी एक मोठी स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने बीसीसीआयने हा उपाय काढला आहे. मात्र १४ सामने वाढल्याने बीसीसीआयला तब्बल ८०० कोटी रुपयांची कमाई करण्याची संधी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!