मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला होता. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला होता. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं होत. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे हा समन्स बजावण्यात आला होता.
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यातील ई-मेल वाद प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने नव्याने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने हृतिकचा जबाब नोंदवून घेतला.
हृतिकने आपल्याला काही खासगी व रोमँटिक ई-मेल पाठवल्याचा आरोनी कंगनाने केला होता. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आणि वाद चांगलाच चिगळला. त्यावेळी हृतिकने सर्व आरोप फेटाळत कंगनाला आव्हान दिले होते. कंगनानेच मला असंख्य ई-मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र 2016 पासून तो तपास थांबला होता. आता गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने हा तपास नव्याने सुरू केला. आपला जबाब नोंदविण्यासाठी हृतिकला समन्स बजावले होते. त्यानुसार जबाब नोंदविण्यासाठी हृतिक रोशन आज पोलीस मुख्यालयात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- दुधाच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ, पण ग्राहकांचे नुकसान नाही तर शेतकऱ्यांना फायदा
- आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे
- कोरोनामुळे शाळा बंद , विद्यार्थीनींच्या हक्काचा ‘रुपयाही’ शासनाने नाकारला
- खा.उदयनराजेंची राज ठाकरेंसोबत मराठा आरक्षणावर चर्चा
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच गायब ?


