Share

कोरोना काळात पोलिसांनी संयमाने लढा दिला – पीएसआय पूनम पाटील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गत वर्षीपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. साधेपणाने आपण हा उत्सव साजरा करत आहोत. मात्र संपूर्ण कोरोना काळात पोलिसांनी अतिशय संयमाने लढा दिला. अजूनही आमची जबाबदारी संपलेली नाही. पीएसआय पूनम पाटील यांनी महाराष्ट्र देशाच्या गणेशोत्सवात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘महाराष्ट्र देशा’ने गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरतीचा उपक्रम राबवला. यावेळी जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय पूनम पाटील यांनी आरतीनंतर कोरोना काळातील आपले अनुभव मांडले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, महाराष्ट्र देशाचे सर्व प्रथम मी आभार व्यक्त करते. त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांना आरतीचा बहुमान दिला. २०२० मध्ये आपण सर्वांनी अतिशय वाईट काळ पाहिला. कोरोनाने अनेकांना भयंकर अनुभव दिले.

मात्र सामान्य नागरिक घरातच राहावा आणि सुरक्षित राहावा यासाठी पोलीस ऑन फील्ड कार्यरत होते. लोकांना घरातच थांबवून ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य होते. आता जरी परिस्थीती सुधरत असली तरी नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे. त्याबरोबरच गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांनी सुरक्षित राहा आणि अनोळखी लोकांपासून सतर्क राहा. यावेळी अतुल पाटील यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!