🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. दरम्यान राणे यांना यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात राणे यांनी जामीनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे राणेंची अटकेची कारवाई अटळ मानली जात आहे. मात्र राणे यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली असती असे विधान केले होते. या विधानाविरुद्धच महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.
दरम्यान नारायण राणे यांच्याविरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्री राणेंच्या अटकेची शक्यता अधिक असल्याचे वर्तवले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा; सरदेसाईंची मागणी
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
