Share

हेमांगी कवीचे पुन्हा एकदा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंगी तिच्या विनोदी अंदाजामुळे लोकप्रिय आहे. तिच्या याच अंदाजामध्ये ती सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले. मात्र या ट्रोल करणाऱ्यांना ती नेहमीच परखडपणे आपले मत व्यक्त करत असते. यातच आता तिने रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या एका पोस्टवर आपल्या परखडपणा स्वभावाबाबत स्पष्ट केले आहे.

हेमांगीने पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘मी सोशल मीडियावर जे काही लिहिते, व्यक्त होते किंवा कुठलेही फोटो, व्हिडिओ शेअर करते. त्यावर लोकांची हमखास एक प्रतिक्रिया असते. तुझ्या घरचे सोशल मीडियावर नाहीयेत का? घरचे म्हणजे खासकरून घरातील पुरुष मंडळी. बाबा आणि भाऊ. हो आहेत की! बाबा होते पण आता ते नाहीयेत.

https://www.instagram.com/p/CS36MjHtdMG/?utm_source=ig_web_copy_link

पुढे ती म्हणते, माझा भाऊ आहे सोशल मीडियावर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या पोस्ट. त्यावर दादाची एकच रिअ‍ॅक्शन असते. गुड ऑर बॅड. मी आहे तुझ्यासोबत, तुझं रक्षण करायला. लहानपणी राखी पोर्णिमेच्या दिवशी औक्षण करून एक धागा बांधायचा आणि मोबदल्यात जे काही मिळायचं/ मिळवायचं गिफ्ट. पैशांपासून ‘मी आहे तुझ्यासोबत’ हे गिफ्ट आणि पैशापलिकडे गेलेलं नातं खूप भारी आहे आणि म्हणूनच मी नाही घाबरत.’ असे म्हणत तिने नेटकऱ्याना उत्तर दिले आहे.

काही दिवसापूर्वीच हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्ट चर्चेत राहिली होती. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले होते. तसेच ती ट्रोल करणाऱ्यांनाही रोखठोक उत्तर देत असल्याचे पाहायला मिळाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!