🕒 1 min read
इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले आहेत. हे दोन्ही सामने उत्कृष्ट होते आणि विशेषतः दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात उत्साह शिगेला होता. सामन्यांच्या या चढ-उतारानंतरही टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत 151 धावांचा मोठा विजय मिळाला आणि भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली.
या सगळ्या दरम्यान, एक गोष्ट खूप काळजी करणारी आहे, ती म्हणजे भारतीय ‘रन मशीन’, म्हणजेच संघाचा कर्णधार विराट कोहली सतत फलंदाजीत निराशाजन कामगिरी करतो आहे. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांमध्ये 0, 42 आणि 20 धावा केल्या आहेत.
विराट कोहली त्याच्या फलंदाजीत सतत अपयशी का होत आहे याबद्दल इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी सांगितले आहे की, विराट कोहलीच्या कर्णधारपदामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे आणि यामुळे हा दिग्गज फलंदाज धावा करू शकत नाही. डेली मेलशी बोलताना ते म्हणाले की, कोहली त्याच्या कर्णधारपदावर इतका भर देत आहे की, त्याचा फलंदाजीवर परिणाम झाला आहे.
कर्णधारपदावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याच्या फलंदाजीत काही कमतरता दिसत आहे. ऑफ-स्टंप बॉल पाहून त्याला काय करावे हे कळत नाही. विराट 2014 मध्ये ज्या चुका करत होत्या त्याच चुका पुन्हा करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं”; नारायण राणे पुन्हा बरसले
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

