🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टानेही आता तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं रवाना झाली होती. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचा या पथकांमधे समावेश आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधे नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने रवाना झालेत. तर नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी गेले आहेत. सध्या ते संगमेश्वरमध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर आता सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टानेही तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. परंतू राणे यांची रवानगी पुणे येथे होणार की नाशिकला होणार याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा; सरदेसाईंची मागणी
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
