Share

‘या’ कारणामुळे आता काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत

Published On: 

मुंबई : शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता प्रस्थापित केली आहे. परंतु आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्यातील वाद आता उफाळून येत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. सध्या संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणायचं असं धोरण काँग्रेसने घेतलेलं दिसत आहे.

आता नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने महापालिका प्रशासनाला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेनेलाच अप्रत्यक्षपणे घेरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेच्या नालेसफाईच्या या आकडेवारीचा पर्दाफाश करणार असल्याचंही रवी राजा यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेने मुंबई शहरात 102 टक्के, पूर्व उपनगरात 93 टक्के तर पश्चिम उपनगर 96 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पालिकेचा हा दावा खोटा असून ठेकेदाराना मदत करण्यासाठी नालेसफाईचे आकडे फुगवले जात आहेत, असा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे.

या सर्व मुद्यांवर आता कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत शिवसेनाला चांगलेच घेरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. जशी जशी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे तसे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप त्यावेळी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!