Share

Chandrakant Khaire | TET प्रकरणात आमदार अब्दुल सत्तारांची चौकशी करा – चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आली आहेत. त्यावरून आता विविध राजकीय पक्षांचे नेते सत्तारांवर निशाणा साधत आहेत. यातच आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील सत्तारांवर टीका केली आहे.

“तुमचंच सरकार आहे. तुम्ही चौकश्या लावा ना. त्यांनी गैरप्रकार केला असेल तर त्यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांची मुलं जर दोषी नसतील तर त्यांनी सीआयडी चौकशी लावावी. जर त्यांची काही चूक नाही तर हा घोटाळा कुणी केला त्याचा शोध लावा आणि त्याला फासावर लटकवा. कोणत्या संस्थेच्या लोकांनी या घोटाळेबाजांना मदत केली? ते शोधा. तसेच अब्दुल सत्तार यांच्या बऱ्याच प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे. ते आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना एवढच सांगेल कि तुम्ही उगीच बडबड करू नका. शांत राहा”, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!