Share

सरपंचाच्या प्रयत्नांतुन ‘या’ गावातील गावठी दारु विक्री बंद

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या एक वर्षापासून गावात अवैधरीत्या विकली जाणारी गावठी दारु विक्री बंद करण्यासाठी सरपंच सदस्य व पोलीस प्रशानाच्या मदतीने अखेर पहुरी गावांतील दारु विक्रीला आळा बसल्याने ग्रामस्थ सर्वांचे कौतुक करीत आहेत.

पहुरी गावात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार जण गावठी दारू विक्री करीत असल्याने अनेकाना दारुचे व्यसन लागल्याने नागरिक कामाला जात नसून दिवसभर दारु पिऊन घरी धिगांणा घालीत राहतात सद्या खरीप हंगामातील शेती तयार करण्याची तयारी शेतकरी करीत असुन या दारुपायी मजुर मिळणे देखील कठीण झाले होते. अनेक तरुण व्यसनाधीन बनले असून गावात वादाच्या प्रमाणात वाढ झाली होती. या दारुमुळे अनेक गोरगरीब कुटुंबात रोजची भाडंणाने डोकेदुखी होत असून महिलांना फार त्रस्त झालेल्या होत्या.

नवनिर्वाचित सरपंचाकडे गावातील गावठी दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली. त्यानुसार सरपंच यांनी वेळोवेळी दारु विक्रेत्यांना सुचना दिल्या व सदस्यांनी ठाम निर्णय घेत तात्काळ पोलीस प्रशासनास गावठी दारु बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार सोयगाव पोलीस ठाण्याचे सह.निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्यासह कर्मचा-यांनी पहुरी गावात जाऊन गावठी दारू विक्रेत्यांना समज दिल्याने गावातील दारु बंद झाल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!